एका कळीची कहाणी
|एक काळी उमलली
हे एकूण आई
आनंदाने फुलली
दोन तिन दिवसांनी
हे बाबांना समझले
दुसऱ्या दिवशीच घर
खेळण्यांनी भरले
हे एकूण आनद
सासूसासर्यांनाहि झाला
सासूबाई म्हणाल्या
माझ्या वंशाचा दीपक आला
तिन चार महिन्यांनी चोरून लपून
गर्भलिंग तपासणी झाली
मुलगी आहे एकूण
सर्वांची चेहरे नाराज झाली .
काळी खुडणार म्हणून
आईचे दुख मावेना
पण करेल तरी काय
सासुपुढे काही चालेना
सरकारने केला आहे
म्हणे एक कायदा
पण येथे नाही झाला
त्याचा काही फायदा
एक होता राजा
आणि एक होती राणी
जन्माआधी संपली
एका कळीची कहाणी
अरे !तिच्याच पोटी जन्मणार
फुले,आंबेडकर सारखे महान
पण आज आम्ही ठेवली
आहे अक्कल गहाण
आजची कळी होणारी
उद्याची माऊली
म्हणूनच गरजेच आहे
जन्माला येणे छकुली
एक स्त्री होती ना
आदी माया शक्ती
छोटीसी कळी खुडताना
कुठे जाते त्याची भक्ती
एकविसाव्या शतकात साऱ्या
जगाची काया पालटली
वाईट विचारांनी मात्र त्याची
जागा नाही झाली
समजा कळी कधीतरी
सुंदर फुल झाली
तरी तिच्या अत्याचारांची
सांगता नाही आली
तिला वाटले कधीतरी
येईल आशेच्या किरण
पण तिच्या या इच्छेची हि
झाली मातीत घुसळण
एक होता राजा
आणि एक होती राणी
किती दुखत आहे ना
या कळीची कहाणी