ऑनलाइन शॉपिंग

online_shopping_इन्फर्मेशन अँण्ड कम्युनिकेशनच्या या जमान्यात टेक्नॉलॉजीमध्ये मोठय़ा प्रमाणावर बदल घडून आला आहे. स्वस्तातले स्मार्ट फोन व इंटरनेटमुळे हल्ली खेड्यातील व्यक्तीही ब्राऊजिंग करून एकाच प्रकारातील शेकडो प्रॉडक्टस ऑनलाइन बघू शकते. यात अगदी शूजपासून, टी शर्ट, मोबाइल, म्युझिक सिस्टिम, लॅपटॉप व विविध इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचाही समावेश आहे. त्यामुळे पारंपरिक दुकानांमध्ये, स्टोअर्ससह मॉलमध्ये प्रत्यक्षात जाऊन होणारा पैशाचा व वेळेचा अपव्यय यामुळे टळू शकतो. ऑनलाइन रिटेलिंगमुळे खरेदीचा विस्तार झाला आहे. ऑनलाइन रिटेलिंगने खरेदीचे दालन सर्वांसाठी खुले केले आहे. त्यामुळे जे लोक रिटेलिंगपासून दूर होते ते आता जवळ आले आहे. ऑनलाइन रिटेलर्स ग्राहकांना काहीशा वाजवी दरात विविध वस्तूंची विक्री करतात. तसेच जे प्रॉडक्ट आपल्या गावात किंवा शहरात मिळत नाही, त्या प्रॉडक्टचीही खरेदी करणे यामुळे शक्य होते.वेबसाइटमुळे आपण केव्हाही (अगदी रात्रीही) ऑनलाइन खरेदी करू शकतो. यामुळे जे लोक जायबंदी आहे किंवा जे लोक आपले घर सोडू शकत नाही अशा लोकांनाही बसल्या जागी वस्तूंची खरेदी करता येते. तसेच खरेदी करण्यापूर्वी आपण इंटरनेटवर विविध प्रॉडक्टबाबत संशोधन करू शकतो, तसेच त्यांच्या किंमतीमधील तुलना करू शकतो; मात्र यासाठी विविध दुकानांना, स्टोअर्सला प्रत्यक्ष भेट देणे शक्य नसते; 

त्याचप्रमाणे ऑनलाइन खरेदीचे जसे फायदे आहे, तसेच तोटेही आहेत. ऑनलाइन रिटेलर्स जरी पारंपरिक दुकानांच्या तुलनेत वाजवी दरात प्रॉडक्टसची विक्री करत असले, तरीही त्या प्रॉडक्टच्या दर्जाबाबत आपल्याला कुणीही शाश्‍वती देऊ शकत नाही. पारंपरिक दुकानांमध्ये जाऊन तुम्ही वस्तूची तत्काळ खरेदी करू शकतात. याउलट वस्तू ऑनलाइन खरेदी केली, तर ती वस्तू घरी यायला काही दिवस लागतात. पारंपरिक दुकानांमधून घेतलेली वस्तू वॉरंटी अंतर्गत परत करणे सहज सोपे असते; परंतु या उलट ऑनलाइन वस्तू परत करणे अवघड असते. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वाहतुकीचा खर्च द्यावा लागतो. दुकानांमध्ये वस्तू खरेदी करताना आपण ती वस्तू प्रत्यक्ष हातात घेऊन त्या वस्तूच्या दर्जाबाबत खात्री करून घेत असतो. या उलट ऑनलाइन वस्तू जरी आकर्षक व चमकदार वाटत असली, तरीही प्रत्यक्षात ती तशी असेलच असे नाही. कपड्यांच्या दुकानांमध्ये ‘फिटिंग रुम’ची सोय केलेली असते. त्यामुळे आपण तेथे जाऊन तो विशिष्ट टी शर्ट किंवा ती जीन्सची पॅँट ‘ट्राय’ करू शकतो. ऑनलाइन खरेदी करताना या सुविधेचा अभाव असतो. ऑनलाइन खरेदीमध्ये वाहतुकीचा खर्चाबाबत सुरुवातीला काहीच सांगितले जात नाही. नंतर मात्र हा ‘शिपिंग’चा म्हणजेच वाहतुकीचा हा अतिरिक्त खर्च या वस्तूच्या मूळ किंमतीत धरला जातो. ऑनलाइन खरेदीत फसवणुकीची शक्यता जास्त असते. यात प्रॉडक्टसची विक्री करणार्‍या तिसर्‍या पक्षाकडून खरेदीदारांची फसवणूक होण्याची संभावना असते. यात हे विक्रेते खरेदीदारांकडून वस्तूंचे पैसे स्वीकारतात; परंतु त्या वस्तू घरी पाठवत नाही. पण ऑनलाइन शॉपिंग कितपत योग्य याचा हि विचार करायाल हवा.