ऑरेंज क्रेप
|१) एक वाटी मैदा
२) एक वाटी गार दुध
३) दोन अंडी आणि एका अंड्याचं पांढरं
४) दोन मोठे चमचे लोणी
५) दोन मोठे चमचे साखर
६) पाव चमचा संत्र्याची साल किसून
७) दोन मोठे चमचे संत्र्याचा रस
८) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) अंड्यातलं पिवळं साखर घालून फेसावं . त्यात मीठ , मैदा , लोणी घालून फेसावं .
२) संत्र्याची साल , रस घालून पुन्हा फेसावं . अंड्यातलं पांढरं वेगळं क्रिमी होईपर्यंत फेसावं .
३) दोन्ही गोष्टी एकत्र कराव्या आणि आधी सांगितल्याप्रमाणे क्रेप करावा .
४) खाताना वर साखर , फेसलेलं क्रीम आणि संत्र्याच्या फोडी घालाव्या .