ओझोन थेरपी

ozone-therapy-ओझोन थेरपी ही प्रामुख्याने अँलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, नेचरोपॅथी या वैद्यकीय पद्धती पूरक उपचार पद्धती आहेत. शरीर शुद्धीकरण चिकित्सा हे या पद्धतीचे प्रमुख कार्य असून, ओझोन या प्रक्रियेंतर्गत मानवी शरीरातील टाकाऊ आणि घातक द्रव्यांचा नाश होतो. पोषक द्रव्य टिकून राहिल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढून शरीराला अधिकाधिक ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास मदत होते. शरीरातील रक्ताभिसरण सुरळीतपणे आणि सुयोग्य प्रमाणात होते. पचनशक्ती सक्षम होण्यास मदत होते. त्यामुळे व्यवस्थित भूक लागते. शांत झोप पण येते. परिणामी रुग्णांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.दोन सेकंद थांब.. जरा मोकळा श्‍वास घेऊ देत, असे वाक्य रोजच्या व्यग्र जीवनात एकदा तरी कानावर पडते. पुरेसा श्‍वासही घ्यायला वेळ मिळत नाही, असा अनेकांचा सूर असतो. हळूहळू थकवा जाणवायला लागतो आणि छोट्या-छोट्या आजारांना निमंत्रण मिळते. याला कारणीभूत कोण? स्वत:ला विसरून झपाटल्यासारखं काम करणारा माणूस, की पर्यावरणाचा दिवसेंदिवस ढासळणारा समतोल? जगण्यासाठी अन्न, पाणी आणि निवारा अशा मूलभूत गरजा माणूस भागवतो; पण मोकळा श्‍वास घ्यायला आवश्यक असणार्‍या ऑक्सिजनची सध्या कमतरता भासतेय. वातावरणातील ओझोन सूर्याच्या अतिनिल किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करतो. हाच ओझोन सुयोग्य प्रमाणात वापरला, तर मानवी शरीरावर यशस्वी उपचार करता येतील. आज जाणून घेऊया ओझोन थेरपी म्हणजे काय. मनुष्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग आहे.

*ओझोन थेरपीम्हणजे काय?

ओझोन थेरपीमध्ये ऑक्सिजन सिलिंडरला ओझोनेटर लावून त्यात विजेच्या लहरी सोडून ओझोन वायू तयार केला जातो. तयार झालेल्या ओझोनमध्ये ९५ टक्के ऑक्सिजन आणि ५ टक्के ओझोन असतो. हा ओझोन वायू आजाराच्या निदानाप्रमाणे आणि व्यक्तिनुरूप रुग्णांच्या शरीरामध्ये विविध मार्गाने, योग्य पद्धतीने उपचारासाठी सोडण्यात येतो.ओझोन थेरपीची किमया!ओझोन हा वायू किंवा सिरपच्या स्वरूपात वापरता येत नाही, तरीही विविध पद्धतीने दिलेली ओझोन थेरपी अनेक आजारांवर उपयुक्त ठरते.

ओझोनेटेड सलाईन : सलाईनमध्ये ओझोन वायू मिसळून दिल्यास शरीरातील चयापचय क्रिया सुधारते, रोगप्रतिपादक क्षमता वाढते. शरीराच्या अंतर्गत भागातील व्रण, कॅन्सर, कावीळ, रक्तभार वृद्धी यामध्येही उपयोग होतो.

इंजेक्शन : संधिवात किंवा सांधेदुखीवर इंजेक्शनद्वारे ओझोन दिल्यास दुसर्‍या खांद्याच्या हालचाली सुरळीत आणि सुलभ होण्यास मदत होते.

ओझोनेटेड पाणी : ओझोनमिश्रीत पाणी एक तास टिकते. याचा उपयोग पोटाचे विकार, छातीत जळजळणं, करपट ढेकर येणे आदी आजारांमध्ये तर होतोच पण अल्सर, तोंडाचा कॅन्सर आणि भाजल्यामुळे येणारी सूज कमी करण्यासाठीही ओझोनचा वापर केला जातो.