ओले काजू मसाला

साहित्य :-kaju masala

१)      दीडशे ओले काजू घ्या (हे मोजून विकत मिळतात .  मार्च , एप्रिल     महिन्यात गोव्यात आणि कोकण , कारवार इथं मिळतात .) 

२)     एक वाटी ताजं खवलेलं खोबरं

३)     पाव किलो कांदे , थोडी कोथिंबीर

४)     तीन मोठे चमचे तेल (तूप)

५)    सात-आठ लसूण पाकळ्या

६)      जरासं आलं , लिंबाएवढी चिंच

७)    चवीनुसार मीठ . 

मसाला :-

१)      दोन चमचे सांबर मसाला

२)     अर्धा चमचा हळद

३)     आठ काळ्या लवंगा

४)     थोडी दालचिनी

५)    जरासं जायफळ

६)      चमचाभर धने

७)    अर्धा चमचा मिरपूड . 

कृती :-

१)      ओले काजू दोन तास पाण्यात भिजवून सोलून घ्या .  कांदे लांब चिरून घ्या . 

२)     सोललेले काजू स्वच्छ धुवून साधारण बारीक चिरून घ्या .  कढाईत तेल     गरम करून घ्या . 

३)     त्यात थोडासा चिरलेला कांदा परतून घ्या .  नंतर त्यातच खवलेलं          खोबरं भाजून घ्या . 

४)     मिरची पूड , हळद , मिरपूड त्यात टाकून मिश्रण चांगलं ढवळून निवत ठेवा . 

५)    गैसवर पातेलं गरम करून त्यात दोन मोठे चमचे तेल गरम करून राहिलेला   कांदा परतून घ्या . 

६)      त्यात चिरलेले ओले काजू टाकून मंदाग्नीवर शिजेपर्यंत ठेवा . 

७)    काजू शिजले की त्यात वरचं मिश्रण पाट्यावर अथवा मिक्सरमध्ये बारीक    वाटून घाला .  वाटताना त्यात चिंचेचा कोळ , कोथिंबीर पण वाटून घ्या . 

८)     तीन वाटया पाणी घालून उकळी आल्यावर मंदाग्नीवर पाच मिनिटं ठेवा .  चवीपुरतं मीठ टाका .