ओल्या नारळाची भाजी

coconut

साहित्य :-

१)      खवलेलं खोबरं दोन वाटया

२)     कांदे दोन

३)     हरभरा डाळीचं पीठ वा भगरा पाऊण वाटी

४)     तिखट

५)    मीठ , साखर .

कृती :-

१)      नारळ स्वच्छ धुवून (वास येत असल्यास मिठ्च्या पाण्यात बुडवून स्वच्छ धुवावा .) खवून घ्यावा .

२)     फोडणीत प्रथम कांदा वं खवलेला नारळ टाकून खमंग परतावं .

३)     नंतर डाळीचं पीठ , तिखट , मीठ , साखर , अर्धी वाटी पाणी त्यावर घालून पीठ शिजेपर्यंत मंद विस्तवावर वाफा आणाव्यात .

४)     चमचाभर कच्चं तेल सोडून मोकळी होईपर्यंत भाजी परतावी .