औषधाची अँलर्जी

medicine allergyसाधारणपणे आजार झाला की, प्राथमिक अवस्थेत डॉक्टरकडे जाण्याऐवजी मनाने औषधे घेण्याकडे अनेकांचा कल असतो.  अशा वेळी व्याधीवर मात करण्यासाठी औषधे घेतली जातात; पण काहीवेळा औषधांची रिअँक्शन येण्याची शक्यता असते. शरीर औषधाशी जुळवून घेण्यास अक्षम ठरल्यास हा त्रास संभवतो. हा त्रास लगेचच होतो किंवा काही वेळाने होऊ शकतो. औषध घेतल्यानंतर रक्तदाब कमी होणे, अंगावर गांध येणे, रुग्ण बेशुद्ध पडणे, अंगावर लाल चट्टे उठणे, तीव्र खाज येणे, तोंडात जखमा होणे, तळपायांना लालपणा येणे ही सगळी रिअँक्शनची लक्षणे आहेत. औषध घेतल्यावर घाम येणे, नाडी वेगाने चालणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे ही तीव्र रिअँक्शनची लक्षणे आहेत. म्हणूनच आपल्याला एखाद्या औषधाची अँलर्जी आहे का याकडे लक्ष देण्याची गरज आहे. डॉक्टरांना याची कल्पना द्यायला हवी. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत. सुट्या गोळ्या, नाव नसलेल्या पाकिटातील गोळ्या घेणे टाळावे. रिअँक्शन असणार्‍या औषधांची नावे लिहिलेले कार्ड बरोबर ठेवणे गरजेचे आहे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *