औषधी हळद

Haldiहळद हा मसाल्याच्या डब्यातला महत्त्वाचा पदार्थ. हळदीतले औषधी गुण सर्वश्रुत आहेत. म्हणूनच भारतीय संस्कृतीत सणवारी अथवा मंगल कार्यामध्ये हळदीला महत्त्वाचं स्थान आहे. आपल्याप्रमाणे जगाच्या विविध भागात मोठय़ा प्रमाणात हळदीचा वापर होतो. हळदीचा मूळ घटक ‘कक्र्युमिन’ हा सर्वोत्तम वर्णरोपक आहे. गोवा आणि कर्नाटकात हळदीच्या पानावर जेवण घेतात. आपल्याकडेही हळदीच्या पानामध्ये काही पदार्थ शिजवले जातात. आयुर्वेदात त्वचा, यकृत, हृदय आणि फुफ्फुस यावर हळद गुणकारी असल्याचे सांगितले आहे. ही वेदनाशामक, जीवाणूविरोधी, रक्तस्राव थांबवणारी, सूज कमी करणारी तसेच अँलर्जीविरोधी आहे. पोटाच्या अनेक विकारांवर आणि जखमांवर हळदीचा वापर होतो. हळदयुक्त चहा सुद्धा खूप प्रभावी मनाला जातो .