कच्च्या केळ्याची भाजी

साहित्य :-kela

१)      चार कच्ची केळी

२)     तुरीची डाळ अर्धी वाटी

३)     मेथी पाव चमचा

४)     लाल तिखट

५)    चवीला गूळ

६)      धने-जिरे पूड एक चमचा

७)    कोथिंबीर

८)     खोबरं

९)      चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      तुरीची डाळ कोरडीच भाजून घ्यावी .  नंतर त्यात मेथी घालून जरा        परतावं आणि उतरवावं . 

२)     नंतर त्यात पाणी घालून कुकरमध्ये शिजवावं .  केळीही कुकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावीत . 

३)     नंतर सालं काढून त्याचे तुकडे करावेत .  तेलाची मोहरी , हिंग , हळद घालून फोडणी करावी . 

४)     त्यात शिजलेली डाळ घालावी .  तिखट , मीठ , गूळ आणि धने-जिरेपूड घालावी . 

५)    जरा वेळ उकळावी आणि उतरवावी .  वरून कोथिंबीर , खोबरं घालावं .