कच्च्या टोमाटोची चटणी
|१) एक वाटी टोमाटोच्या फोडी
२) दहा-बारा कढीलिंबाची पानं
३) एक मोठा चमचा उडदाची डाळ
४) चार-पाच हिरव्या मिरच्या
५) चवीला साखर
६) एक मोठा चमचा तेल
७) फोडणीसाठी जीर , हिंग , हळद
८) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) थोडया तेलावर उडदाची डाळ लालसर परतून घ्यावी . फोडणी करून त्यात टोमाटोच्या फोडी , कढीलिंब , मिरच्या घालून परतावं .
२) टोमाटो शिजवून गार करून घ्यावे . मिक्सरमध्ये उडदाची डाळ बारीक करावी .
३) त्यावर शिजलेला टोमाटो , मीठ , साखर घालून जाडसर चटणी वाटून घ्यावी .
2 Comments
मस्त.चवदार.भाकरीबरोबर चांगली लागते ,
r u sure ?