कच्च्या पपईची भाजी (२)

papaya

साहित्य :-

१)      एक मध्यम नारळाच्या आकाराएवढी कच्ची पपई

२)     अर्धा नारळ खवून

३)     जिरं एक सपाट चमचा

४)     हिरव्या मिरच्या चार-पाच

५)    चवीपुरता गुळ-मीठ

६)      तुरीची किंवा हरभऱ्याची भिजवलेली डाळ दोन चमचे

७)    तेल अर्धी पळी , फोडणीचं साहित्य .

कृती :-

१)      पपईची साल काढून मध्यम आकाराच्या फोडी करून घ्याव्यात .

२)     तेलाची हिंग , हळद , मोहरी घालून फोडणी करून त्यात पपईच्या फोडी घालून परताव्या .

३)     पाणी पाव वाटी घालावी .  जिरं , मिरची , खोबरं वाटून घालावं .

४)     चवीपुरता गुळ व मीठ घालून मंद आचेवर वाफ आणावी .