कच्च्या पपईची भाजी

Papaya Kadag puli

साहित्य :-

१)      तीन वाटया फोडी होतील एवढी मध्यम आकाराची कच्ची पपई ,

२)     लाल सुक्या मिरच्या एक-दोन

३)     भिजवलेली हरभरा डाळ वा मुग डाळ पाऊण वाटी किंवा भिजवलेले वाटाणे अर्धी वाटी

४)     तेल , फोडणीचं साहित्य

५)    मीठ , तिखट

६)      धणेपूड , गुळ चवीपुरता .

कृती :-

१)      पपईची साल नीट काढून तिच्या बेताच्या आकाराच्या फोडी कराव्यात .

२)     फोडणी करून त्यात प्रथम भिजवलेली डाळ टाकून थोडी परतून घ्यावी .

३)     त्यावर पपईच्या फोडी टाकून परताव्यात .  वाफा आल्यावर अर्धी वाटी पाणी घालून झाकण ठेवावं .  (फोडींच्या तळात दिसेल एवढंच .)

४)     मंद आचेवर डाळ व भाजी शिजल्यावर मीठ , गुळ चवीपुरतं घालावं .

५)    तिखट , धणेपूड घालून अलगद ढवळावी .  वरून खोबरं , कोथिंबीर घालावी .

६)      भाजीत गरम पाणी घालावं .  एकसारखी ढवळू नये .