कढी पकोडे

साहित्य :

पकोडा
१/२ कप बेसन पिठ
१/२ कप कांदा, बारीक चिरून
१/२ कप मेथी, बारीक चिरून
चवीपुरते मिठ
१/४ टिस्पून बेकिंग सोडा
१ टिस्पून ओवा
१/२ टिस्पून जिरे
१ टेस्पून किसलेले आले
१ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून हळद
तळण्यासाठी तेल

कढीसाठी
१ कप दही
१/४ कप बेसन
२ टेस्पून तेल
१/२ टिस्पून मेथी दाणे
१/२ टिस्पून हळद
३-४ कढीपत्ता पाने
१ टिस्पून लाल तिखट
१ सुकी लाल मिरची
२ टेस्पून कोथिंबीर
चवीपुरते मिठ

कृती :
प्रथम पकोड्यांचे पिठ भिजवून तयार ठेवावे, नंतर कढी बनवावी. कढी उकळत असताना दुसर्‍या गॅसवर पकोडे तळायला घ्यावेत. पकोडे तळले कि उकळत्या कढीत घालावेत.
पकोड्यांचे पिठ भिजवण्यासाठी, एका भांड्यात पकोड्यासाठीचे सर्व साहित्य एकत्र करावे. थोडे पाणी घालून घट्टसर भिजवावे. झाकून ठेवावे आणि कढी करायला घ्यावी.

कढी :
१) दही घोटून घ्यावे. त्यात बेसन पिठ घालून परत घोटावे. त्यात गरजेनुसार पाणी घालून ताक बनवून घ्यावे. चवीपुरते मिठ घालावे.
२) एका खोलगट पॅनमध्ये २ टेस्पून तेल गरम करावे. त्यात मेथी दाणे घालून परतावे. लाल मिरची, हळद आणि कढीपत्ता घालून काही सेकंद परतावे. नंतर बेसन घातलेले ताक त्यात घालून ढवळावे. लाल तिखट घालावे. मध्यम आचेवर कढी उकळू द्यावी. उकळी येईस्तोवर ढवळावे.

पकोडे :
३) कढी उकळायला लागली कि आच मंद करा. आणि दुसर्‍या गॅसवर पकोडे तळायला घ्या. मिडीयम हाय हिट वर छोटे छोटे पकोडे तळून घ्या. तळलेले पकोडे लगेच कढीत घाला. एकदा ढवळून पॅनवर झाकण ठेवा आणि साधारण २० मिनीटे मंद आचेवर कढी उकळू द्या. कढी उकळताना मधेमधे ढवळा.

कोथिंबीरीने सजवून भाताबरोबर सर्व्ह करा.