कधी येशील पावसा?

dushklजेव्हा दुष्काऴ पडतो तेव्हा भेगा जमिनीलाचं नाही तर काळजालाही पडतात

सध्या महाराष्ट्र दुष्काऴाने होरपळतोय,जून महिना ऊलटून गेला तरी अजुनही पावसाने हजेरी लावलेली नाही.शिवाय पावसाचं भाकीत वेधशाऴेनं 15 जूलै नंतर वर्तवलेलं आहे.त्यातल्या त्यात वेधशाऴेचे अंदाज नेहमी फसवे ठरतात त्यामुऴे ईतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात भिषण दुष्काळ येण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत.

पेरणीचा हंगाम सरत आला तरी पावसाचा पत्ता नाही,शेतकरी हवालदील झाला आहे.गुर ढोरांना चार राहिला नाही,पाणवठा सुकला आहे,धरणात महिनाभर पुरेल केवळ एवढाच पाण्याचा साठ आहे.महागाईने जोर धरला आहे.घरात असलेला धान्याचा साठा संपत चालला आहे,राशानिंगच धान्य खाऊन दिवस काढावे व लागत आहेत.यंदाही पर्जन्य कमी राहिलं किव्हा आलच नाही तर १९७२ सालापेक्षा येणारा दुष्काळ महाभयंकर असल्याच शास्त्रज्ञाचं म्हणन आहे.

यंदा पावसान अशी काही दडी मारली आहे की पावसाळा लागून महिना झाला तरी उन्हाचा दाह काही कमीत होत नाही.रानोमाळ नुसत पडीत दिसत आहे,शाळकरी मुल येरे येरे पावसा अशी गाणी गात आहेत मात्र यंदा पावसाला पैशाचंअमिषही मोहवू शकत नसल्याच दिसत आहे.

विठ्ठलाच्या वारीला गेलेल्या वारकर्याला आपल्या तहानलेल्या मातीची चिंता लागली आहे म्हणून तोही म्हणतो आहे

नको नको देवा मला सोन्या चांदीच दान रे

फक्त भिजव पांडुरंगा हे तहानलेल रान रे