कन्याकुमारी
|स्वामी विवेकानंद स्मारक – केरळ पर्यटन स्थळ
केरळला गेल्यानंतर तुम्ही तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे गेला नाहीत तर तुमच्या केरळ दौऱ्याला काहीच अर्थ नाही. कन्याकुमारी हे ठिकाणही समुद्र किनारी आहे. येथील विवेकानंद स्वामींचे स्मारक आहे आणि कन्याकुमारीचे मंदिर आहे. शिवाय येथे सूर्याेदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठीही गर्दी असते. या ठिकाणी तुम्हाला सुंदर मोत्याचे दागिने मिळतील. हिंदी महासागर, बंगालची खाडी आणि अरबी समुद्र यांचा सुरेख संगम या ठिकाणी होत असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचे तीन वेगळे रगं दिसतात. तामिळनाडूत आल्यानंतर तुम्हााल कन्याकुमारीला यायचे आहे. तुम्ही या ठिकाणी बस करुन येऊ शकता. येथे तुम्हाला तुमचा संपूर्ण दिवस घालवता येईल.
पाहण्यासारखी ठिकाणं –
विवेकानंद रॉक गार्डन, कन्याकुमारी मंदिर, तिरुवॅलुवर पुतळा, वट्टाकोटी किल्ला, कन्याकुमारी बीच
कन्याकुमारीमध्ये करण्यासारख्या गोष्टी –
कन्याकुमारी येथील प्रसिद्ध ठिकाणं असले तरी ते तुलनेत शांत आहे. तुम्ही सकाळी कन्याकुमारी मंदिर आणि रॉक गार्डन पाहिल्यानंतर आजुबाजूची ठिकाणं पाहू शकता.
