कमतरता ‘ड’ जीवनसत्त्वाची

vitamin d 1शरीराकरिता ‘ड’ जीवनसत्त्व फार महत्त्वाचे असते, कारण यामुळे काही महत्त्वाची कार्य घडण्यास मदत मिळते. ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता ही मधुमेह, हृदयाचे विकार आणि अगदी कर्करोग यासारख्या आजारांना निमंत्रण देत असते . ‘ड’ जीवनसत्त्वाची आवश्यक तेवढी मात्रा मिळविण्याकरिता, शरीर दररोज किमान ७५ टक्के प्रमाणात तरी सूर्याच्या थेट संपर्कात येणे फार आवश्यक असते.  ‘ड’ जीवनसत्त्वाची शरीरात संरक्षक अशी भूमिका असते; पण सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात न येणे, सनस्क्रीन लोशनचा वापर आणि खाद्यपदार्थातून पूरक आहार न मिळाल्याने भारतीयांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता झपाट्याने वाढते आहे. ‘ड’ जीवनसत्त्वाची चाचणी करून घेणे आणि योग्य ती पूरक अशी औषधं घेणे फार आवश्यक आहे, जेणे करून भविष्यात उद्भवणार्‍या कमतरतेकरिता आपण आधीपासूनच तयार राहायला हवे.

भारतीयांना आहारातून आवश्यक तेवढी ‘ड’ जीवनसत्त्वाची मात्रा मिळत नाही, कारण खाद्यपदार्थात ‘ड’ जीवनसत्त्वाचे स्रोतदेखील तसे कमीच आढळतात, शाकाहारी आहारात ही कमतरता अधिक आहे आणि बाजारातील फॉर्टिफाईड खाद्यपदार्थातदेखील ‘ड’ जीवनसत्त्व आढळून येत नाहीत. समुद्री मासे जसे तुना आणि सॅल्मोन यात सगळ्यात अधिक ‘ड’ जीवनसत्त्व असल्याचे सांगितले जाते, पण याचे सेवन हे सर्वसामान्यपणे केले जात नाही. शिवाय फार कमी लोकांना ‘ड’ जीवनसत्त्व घेण्याच्या महत्त्वाची माहिती आहे. इतर घटक जसे वय, लठ्ठपणा, मूत्रपिंडाच्या कार्याचा अभाव आणि क्रोहन्स डीसीज, सिस्टिक फायब्रोसिस आणि सिलियॅक आजारांसारख्या काही वैद्यकीय आजारांमध्ये तर ही कमतरता अधिक प्रमाणात आढळून येते आणि त्याचा धोकादेखील त्यांना अधिक असतो. त्यामुळे भारतीयांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची वाढती कमतरता ही एका नवीन अशा घातक आजाराची सूचना देते. ज्याकडे लक्ष देणे फार आवश्यक आहे. सरकारने तपासणी, पूरक आहार आणि मजबुतीकरणाच्या दृष्टीने कोणतीही राष्ट्रीय योजना किंवा मार्गदर्शिका उपलब्ध करून दिलेली नाही, पण ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आणि संबंधित आजारांबद्दल आपण जागरूकता बाळगणे ही आता काळाची गरज आहे, असेही तज्ज्ञ सांगत आहेत.शरीराकरिता ‘ड’ जीवनसत्त्व फार महत्त्वाचे असते, कारण यामुळे काही महत्त्वाची कार्य घडण्यास मदत मिळते. ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता ही मधुमेह, हृदयाचे विकार आणि अगदी कर्करोग यासारख्या आजारांना निमंत्रण देत असते .