करण्याआधी विचार करा !

tattooअंगावर आपल्या नावाचे किंवा वेगवेगळय़ा डिझाइनचे टॅटूज काढून घेण्याची फॅशन आता सगळीकडे चांगलीच कॉमन झाली आहे, मात्र उत्साहाच्या भरामध्ये टॅटू काढताना विशेष असा विचार केला जात नाही. एखाद्या सेलिब्रिटी किंवा मित्राने काढलेला टॅटू आवडला की, अगदी तसाच टॅटू आपल्याला हवा असतो, मात्र टॅटू काढून घेताना त्यामागील संकल्पनेचा किंवा अर्थाचा विचार करणे गरजेचे आहे. एखाद्या कॉपी स्टाइलमुळे तुम्ही स्वत:ची मूळ ओळख हरवून बसाल किंवा तुमच्यामध्ये स्वत:ची स्वतंत्र अशी ओळख निर्माण करण्याची इच्छा नाही, असे इम्प्रेशन तुमचे समोरच्यावर पडू शकते. साधारणत: टॅटू म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला, विचारांना व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणारे माध्यम आहे. त्यामुळे तुमची आवड, तुमच्या व्यक्तिमत्त्वातील गुणांना साजेसा असा टॅटू काढणे केव्हाही योग्य ठरते. पारंपरिक विशेषणे अथवा संदेश अशा प्रकारच्या टॅटूजविषयी बोलायचे झाले, तर नक्की सुरुवात कुठून करावी हेच कळत नाही. अशा प्रकारचे टॅटूज निर्थक प्रकारात मोडणारे असतात.
प्रिय व्यक्तीविषयीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी तिचे अथवा त्याचे नाव थेट हातावर गोंदवून घेण्याची कल्पना कितीही रोमँटिक वाटत असली, तरी शक्यतो असे करणे टाळा. कारण भविष्यात तिच प्रिय व्यक्ती काही कारणाने तुमच्यापासून दूर गेल्यास टॅटूच्या रूपाने मनाला झालेल्या जखमांचे व्रण तुमच्या अंगावर राहू शकतात. आयुष्य कधी वळण घेईल किंवा नाती कशी बदलून जातील याबद्दल ठामपणे असे काहीच सांगता येत नाही. अशा प्रकारचे टॅटू काढून घ्यायचे असल्यास, सुरुवातीला टेम्पररी टॅटूजचा पर्याय निवडावा. त्यापेक्षाही सोपा उपाय म्हणजे पेन किंवा मार्करने टॅटू काढावा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *