करममलाची भाजी
|(‘करमल’ हे दक्षिण कोकणात पिकणारं आंबटसर चवीचं फळ आहे . त्याचं लोणचं , भाजी छान होते .)
साहित्य :-
१) करमलं तीन-चार
२) मीठ , तिखट
३) मेथी दाणे पाव चमचा
४) फोडणीचं साहित्य
५) ओलं खोबरं .
कृती :-
१) करमलाच्या शिरा काढून त्याच्या फोडी कराव्यात . त्यांना थोडा वेळ मीठ लावून ठेवावं .
२) त्यानंतर तेलात मोहरी , हिंग , मेथी दाणे टाकून फोडणी करावी .
३) त्यावर करमलाचे तुकडे टाकून परतावेत .
४) तिखट , मीठ खोबरं टाकून चांगले शिजवावेत .