करा उपाय शरीरस्वास्थ्यसाठी .

health 1शरीरस्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी हरतर्‍हेचे प्रय▪केले जातात. हे करत असतानाच काही छोट्या गोष्टीही लक्षात घेणे आवश्यक ठरते. भाज्या करताना शक्यतो लोखंडी कढईत कराव्यात. त्यामुळे भाज्यांमध्ये लोह उतरते आणि त्याचा शरीराला उपयोग होतो. विशेषत: स्त्रियांना लोहाची अधिक गरज असते. सकाळी लवकर उठून दोन ग्लास पाणी प्यावे. या पाण्यात लिंबू किंवा मीठ मिसळल्यास अधिक उत्तम. शक्यतो रात्रीचा आहार हलका असावा. मऊ खिचडी, एखादी फळभाजी असे पदार्थ चालतील; मात्र रात्रीच्या जेवणात मसालेदार पदार्थांचा वापर करू नये. दिवसातून एखादे फळ तरी नक्कीच खावे. भूक नसताना खाऊ नये. आहारात जिरे, आले, लसूण, मेथीदाणे यांचा भरपूर वापर करावा. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. सकाळी किंवा संध्याकाळी मोकळ्या वातावरणात फिरायला जाणेही हितकर ठरते.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *