करिअर -इंटेरिअर डिझायनर

designडिझायनरइंटेरिअरअलीकडच्या काळात व्यावसायिक क्षेत्रात वाढत्या स्पर्धेमुळे दहावी-बारावीनंतर तरुण-तरुणींना इंटेरिअर डिझायनर म्हणून करिअर करण्याचा पर्याय खरोखरच उत्कृष्ट आहे.
दहावीनंतर दोन वर्षांचा डिप्लोमा इन इंटिरिअर डिझायनिंग करिअरसाठी उपयुक्त आहे? असा प्रश्न अनेक पालक विचारतात. कोर्स फार खर्चिक आहे का? फार भांडवल लागतं का? नोकर्‍या मिळतात का? हा अभ्यासक्रम कुठे करावा? किती कालावधीचा करावा? याबद्दल विद्यार्थ्यांच्यात साशंकता असते. महत्त्वाचा मुद्दा हा की डिप्लोमासाठी इंजिनीयरिंगप्रमाणे गणित विषयाची आवश्यकता नाही. सहजसाध्य, ड्रॉइंग, चित्रकलेची आवड असणार्‍यांना योग्य कोर्स. हा डिप्लोमा म्हणजे पूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण आहे. कारण इंटिरिअर डिझायनरचा व्यवसाय हा सर्व देशांत कौशल्यावर आधारित मानला जातो. प्रत्येक देशात इंटिरिअर डिझायनरच्या असोसिएशन्स आहेत. महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण मंडळाची मान्यता असलेल्या इंटिरिअर डिप्लोमा पूर्ण करणार्‍यांनाच या असोसिएशन्सची मेंबरशिप मिळू शकते. इंटिरिअर डिझायनरला इलेक्ट्रीकल फिटिंग, प्लंबिंग व सॅनिटेशन, एससी, कॉम्प्युटर्स, ईपीपीएक्स, कुशनिंग, कर्टन्स, सिव्हिल वर्क, आरसीसी वर्क, कर्मशिअल आर्ट इत्यादींसारख्या विषयांची पायाभूत माहिती असणे गरजेचे आहे. रेसिडेन्शिअल आणि कर्मशिअल जागांची अंतर्गत रचना हे दोन्ही भिन्न प्रकार आहेत. या दोन्ही शाखांचा अभ्यास जाणीवपूर्वक करायला हवा. फर्निचर हा यातील मुख्य भाग असल्यामुळे सुतार कामातील पूर्ण ज्ञान असणे गरजेचे असते. इंटिरिअर डिझायनिंगच्या परिपूर्ण अभ्यासक्रमात टेक्निकल विषयांचा अंतर्भाव असतो. इंटिरिअर डिझायनरला आणखी दोन बाबींचा स्वत:हून विचार करावा लागतो. अनेक कौशल्ये आत्मसात करावी लागतात.
इंटिरिअर डिझायनर या डिप्लोमा कोर्समध्ये इतर कौशल्यांसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम वाढविलेले आहेत. लेखी अभ्यासक्रमाबरोबर प्रॅक्टिकलला या विषयात खूप महत्त्व आहे. त्यामुळे दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एखाद्या आर्किटेक्ट किंवा इंटिरिअर डिझायनरबरोबर एक-दोन वर्षे प्रॅक्टिकल अनुभव घेणे गरजेचे आहे. सिव्हिल, आर्किटेक्चर, आरसीसी, इलेक्ट्रिकल्स, प्लंबिंग इत्यादी सेवा, रचना, सौंदर्यदृष्टी, तसेच इस्टीमेट्स आदी अभ्यासक्रमातील घटकांचा अभ्यास करायचा तर सहा महिने, एक वर्षाचे खाजगी कोर्स करून उपयोग होणार नाही. पार्टटाईम कोर्समधून तुमचा छंद जोपासला जाईल, परंतु तुम्ही व्यवसाय करू शकणार नाही व प्रोफेशनल इंटिरिअर डिझायनर होऊ शकणार नाही, पण गांभिर्याने इंटिरिअरचा व्यवसाय निवडायचा असेल, तर महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण (बीटीई) पूर्ण वेळ (दोन वर्षे)
चा डिप्लोमा करणे गरजेचे आहे.