करून पहा.

pav bhaji१.पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे. यामुळे पावभाजीला छान रंग येतो.

२.पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा. यामुळे पाव चांगले कापले जातात.

३.फरसबी, मटारचे दाणे, भोपळी मिरची इ. भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या. यामुळे रंग हिरवागार राहतो.

४.अळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे. यामुळे वड्या चुरचुरीत होतात.

५.लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्या. नंतर सोलून साठवून ठेवाव्या. पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.