कसा असावा मुलांचा ब्रेकफास्ट?

breakfastमुलांचं लक्ष खेळण्यात जास्त आणि खाण्यात कमी असतं. समोर येईल त्याला नाकं मुरडणं हाच त्यांचा स्वभाव. त्यांना खाण्याची बळजबरी करावी लागते. म्हणूनच त्यांच्या आहारात पोषणमूल्ययुक्त पदार्थ असण्याची दक्षता घ्यावी. या दृष्टीनं त्यांचा नाश्ता हेवी असण्याकडे लक्ष पुरवावं. मुलांना रोजच पोहे, उपीट अथवा शिरा नको असतो. सकाळच्या घाईत अन्य पदार्थ बनवण्याएवढा वेळ नसतो. अशावेळी काही उपायानं नाश्त्याद्वारे पोषणमूल्य पुरवण्याचा मार्ग अवलंबता येतो. यामध्ये फ्रुटस्मूदी, ओटमिल, पॅन केक्स, फळं, कडधान्य, मिल्क शेक, ज्यूस यांचा समावेश असावा. बेरी, केळं अथवा अन्य फळांचा गर लो फॅट दुधात मिसळून स्मूदी बनवल्यास काबरेहायड्रेट्स, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि कॅल्शियमचा योग्य पुरवठा होतो. या वेळी दुधाऐवजी योगर्टही वापरता येईल. पॅनकेक हा मुलांचा आवडता प्रकार. यासाठी कणीक, रवा आदीमध्ये ताजी फळं आणि सुका मेव्याचा वापर करून पोषणमूल्य वाढवता येते. फॅट फ्री व्हीप्ड क्रीममुळे हा केक आकर्षक बनवता येईल. नाश्त्यामध्ये सफरचंद, केळं आणि किवीजचा वापर अवश्य असावा. फळांच्या फोडीवर योगर्ट आणि काळं मीठ पसरावं. काळी मिरी पावडर पसरल्यानं चव वाढते. व्हीट किंवा ओट फ्लेक्स हाही उत्तम पर्याय आहे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *