कहाणी खुडलेल्या कळीची

Flowersफक्त चिमुटभर स्वातंत्र्याची

होती तुझ्याकडून अपेक्षा

तेही नाही दिले मला तू

मातीत मिळाल्या माझ्या आकांक्षा

 

स्वप्न पाहायचे होते मला

या रंगीबेरंगी दुनियेचे

खुडून टाकली कळी तू

आटले तुझे स्त्राव मायेचे

 

मी अभागी दुबळी पोर

न करू शकले तुझा प्रतिकार

याचाच फायदा घेतला आहे बये तू

दिलेल्या शिक्षेबद्दल तुझे आभार

 

न भान तुला तुझ्या स्त्रीत्त्वाचे

म्हणून मला रोखले तू पोटातच

तुझ्या अश्या या कलंकी पापाला

सुध्दा तू दाबून ठेवले ओठातच

 

गतजन्मी केलेल्या पापाचे मला

मिळाले न जन्मायाचे फळ

का जगात तुझ्यासारखी आई

जी न करे मुलीचा साभाळ

 

माझ्या केलेल्या खुनाची

तू आहेस माझी गुन्हेगार

तुझ्यामुळे गेला माझा जीव

आणि सुकली माझ्या आयुष्याची बहार

 

तुला न कधी माफी बये

तू आहेस एक स्त्री खुनी

जिच्या अविचारामुळे माझ वाटोळ

आणि तुझ्या आयुष्याची साज सुनी

 

तुला जगण्याचा नाही हक्क

तू स्त्रीभून हत्या केलीस

एका कोवळ्या जीवाला संपवून

तू तुझ्या अस्तित्वाला मेलीस

 

–  रोहन साहेबराव पाटील