कांदे पोहे

Kanda-Poha

साहित्य :-

१)      पाव किलो पातळ पोहे

२)     चार-पाच हिरव्या मिरच्या

३)     दोन मोठे कांदे , अर्धा लिंबू

४)     अर्धी मुठ शेंगदाणे

५)    दहा-बारा कढीलिंबाची पानं

६)      एक पळी तेल , फोडणीचं साहित्य

७)    चवीनुसार मीठ-साखर

८)     ओलं खोबरं एक वाटी

९)      मुठभर चिरलेली कोथिंबीर .

कृती :-

१)      मोहरी , हळद , कढीलिंबाची पानं घालून तेलाची फोडणी करावी .

२)     मग यात शेंगदाणे , मिरच्यांचे तुकडे , चिरलेला कांदा घालवा व कांदा    शिजेपर्यंत दोन मिनिटं परतून घ्यावा .

३)     मग पोहे घेऊन त्यावर मीठ-साखर , लिंबाचा रस घालावा .  वरून फोडणी    घालून पोहे कालवून घ्यावेत .  नंतर खोबरं-कोथिंबीर घालून परत हलक्या  हातांनी कळवावेत .