कांद्याच्या पातीचा झुणका

साहित्य :-spring onion bhaaji

१)      कांद्याची पात एक जुडी

२)     हरभरा डाळीचं पीठ एक वाटी

३)     हळद अर्धा चमचा

४)     मिरची पावडर एक चमचा

५)    तेल पळीभर

६)      जिरं एक चमचा

७)    मोहरी , पाणी

८)     चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      कांद्याच्या पातीपासून कांदे वेगळे काढावेत .  पात स्वच्छ धुवून चिरून घ्यावी . 

२)     त्यामध्ये डाळीचं पीठ , तिखट , मीठ घालून एकत्र करावं .  जिरं-मोहरीची  फोडणी करावी . 

३)     मग एकत्र केलेलं पात आणि पीठ टाकावं .  अर्धा कप पाण्याचा हबका मरवा .  अलगद मिश्रण हलवावं . 

४)     झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ येऊ दयावी .  मग परत हलवून पाच मिनिटं झाकण न ठेवता झुणका होऊ दयावा . 

One Comment