काकडीचा कोरडा
|साहित्य :-
१) मोठया मावळी काकड्या तीन-चार
२) लसूण चार-पाच पाकळ्या
३) डाळीचं पीठ अर्धी वाटी
४) ओवा अर्धा चमचा
५) तेल पाव वाटी
६) फोडणीचं साहित्य
७) मीठ व आवडीप्रमाणे तिखट .
कृती :-
१) काकडीची सालं काढून काकडी किसून घ्यावी . ती पिळू नये . फोडणी करून त्यात लसूण ठेचून घालावा .
२) ओवा घालून त्यात किसलेली काकडी टाकावी . लगेचच मीठ व तिखट घालावं .
३) दोन वाफा आल्यावर हळूहळू डाळीचं पीठ भुरभुरावं . एकीकडं भाजी हलवत मोकळी होईपर्यंत पीठ पेरत राहावं .
४) नंतर परत दोन-तीन वाफा येऊ द्याव्यात . या भाजीचा बटाट्याप्रमाणे छान लागतो . वऱ्हाडात या पद्धतीनं केलेली थालिपीठही आवडती आहेत .