काजूची उसळ

साहित्य :-kaju usal

१)      ओले काजू एक वाटी

२)     धने-जिरं एक एक चमचा

३)     सुक्या मिरच्या एक-दोन

४)     ओलं खोबरं अर्धी वाटी

५)    चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      ओले काजू पाण्यात टाकून नीट सोलून व धुऊन घ्यावे .  (त्यावर चिक असल्यानं घसा खवखवतो .)

२)     धने , जिरं , सुक्या मिरच्या गरम करून घ्याव्या .  अर्धी वाटी ओलं खोबरं  आणि वरील सर्व पदार्थ वाटून घ्यावे . 

३)     काजू फोडणीला टाकून त्यात एक वाटी पाणी ओतावं .  उकळी आल्याबरोबर  मीठ टाकावं . 

४)     काजू शिजत आले की त्यात वाटलेला मसाला घालून ढवळावं .  आवश्यक असेल तर थोडं पाणी , आवडत असल्यास थोडा गूळ व जराशी चिंच घालावी .  या उसळीत गरम मसाला व भाजून कांदाही चांगला लागतो .   

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *