कानडी मक्तेदारी ….

maharमहाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या अनेक गावांच्या आणि बेळगाव या शहराचा मालकी वाद हा अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.त्यावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सर्वांच लक्ष आहे.अश्या परिस्थितीत जैसे थे अशी भूमिका कर्नाटक प्रशासनाने घ्यायला हवी होती मात्र नेहमी बेळगाव तसेच सीमेवर असलेल्या मराठी ,माणसाचं खच्चीकरण कर्नाटक सरकार कडून वारंवार होत आहे.आता तर हद्दच झाली.

येळ्ळूर गावच्या वेशीतील “महाराष्ट्र राज्य’ हा फलक पोलिसांनी हलविला. मात्र, ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक करून पोलिसांना पिटाळून लावले. त्यानंतर पुन्हा त्याठिकाणी महाराष्ट्र राज्य असा फलक लावण्यात आला. कर्नाटक पोलिसांनी आज सकाळी हजारो पोलिसांच्या उपस्थित प्रांताधिकारी शशिधर बगली यांच्या उपस्थितीत पुन्हा जेसीबीच्या साह्याने फलक तर हलविलाच, त्याचवेळी गावातील काही महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोलिसांना भेटायला गेले. या वेळी नेत्यांवर पोलिसांनी दादागिरी सुरू केली.

कर्नाटक पोलिसांनी अनेक मराठी भाषकांच्या घरांचीही मोडतोड केली आहे, तर काही घरांमध्ये घुसून पैसे आणि मोबाईलही लांबवले. गावात पोलिसांनी येऊ नये म्हणून वडगावमधून आज सकाळपासून रस्ता बंद ठेवला आहे.