कामगार नव्हे मी तळपती तलवार आहे .

१ मे. हा महाराष्ट्रदिन म्हणुन साजरा केला जातो तसा तो कामगार दिन म्हणुन देखील साजरा केला जातो,kamgar
मात्र कामगार म्हणावं अशी कामगार माणस किती उरली आहेत हा तर संशोधनाचा विषय ठरू शकतो.
लालबाग -परळ,मुंबई इथलया  गिरणी कामगारांच आयुष्य कसं चालु आहे ह्याची विचारणा कुणी केली आहे का? गिरण्या बंद पडल्यावर त्यांच्या उपजीविकेला थारा मिळाला का?
ह्यांसारखे अनेक प्रश्न ह्या कामगारदिनी निर्माण होतात.
मुंबई मध्ये,एकट्या डबेवाल्यांना सोडलं तर पाहिजे तेवडी कामगार संघटना (युनियन) मोठ्या प्रमाणातली पाहायला मिळत नाही.
धुणी भांडी करणाऱ्या मराठी स्त्रिया आता क्वचितच दिसत आहेत,कारण उत्तर प्रदेश-बिहार इथल्या वाढत्या मजूर वर्गांनी इथले कुली काम ,
घर काम अल्पश्या पगारावर स्वीकारले असल्या कारणाने,मराठी मजूरवर्ग क्वचितच शिल्लक राहिला आहे.
तसेच उभ्या महाराष्ट्रातल जर आपण चित्र पाहिलं तर,ते याहुनी काही वेगळ नाही.
माथाडी कामगार,रिक्षा युनियन,गिरणी कामगार,शेतमजूर,ह्यांसारख्या अनेक कामगारीतेचा प्रकार असणाऱ्या कामगारांना रोजगार आता मिळेनासा झाला आहे,
ह्याच कारण आहे,वाढत आधुनिकीकरण….!
वाढत्या संशोधनामुळे कमीत-कमी मनुष्य बळ वापरून जास्तीच काम करणारी यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत.
शंभर  मजुरांच काम एका यंत्राने शक्य झाल्यामुळे,ह्या कामगारांवर बेरोजगारीची वेळ ओढवलेली आहे,
महाराष्ट्र प्रगती पथावर आहे,नव-नवीन संशोधन अलीकडे होतांना दिसत आहेत,हि अतिशय स्तुत्य अशी बाब आहे,
मात्र ह्या लाखो कामगारांच्या रोजनदारीच काय?हा प्रश्न नक्कीच आपल्यालाही पडला असेल………