कायरस भात

 

 

kayras

 

साहित्य :- 

१) एक वाटी बासमती तांदूळ 

२) मीठ 

३) तेल एक डाव बेताचा भरून , फोडणीच साहित्य ,

काकडीचा कायरस :-

१) एक मोठी काकडी 

२) एक डाव चिंचेचा कोळ 

३) सुपरिएवढा गुळ 

४) पाव वाटी दाण्याचा कुट 

५) अर्धा चमचा मोहरी पूड 

६) पाव वाटी ओलं खोबरं 

७) दोन चमचे तिखट . 

कृती :- 

१) काकडी बारीक चिरून एक वाफ आणावी आणि वरीलप्रमाणे साहित्य घालून कायरस तयार करावा .

२) धुतलेले तांदूळ घेऊन आधणाच पाणी घालून त्याचा मोकळा भात करावा .

३) नंतर त्यात कायरस घालावा .  मसाला कोणताही घालू नये .