काळजी ओठांची

lip careथंडीत त्वचेच्या शुष्कतेमुळे हा त्रास होतो. अशा परिस्थितीत ओठ फुटण्याचा, त्वचा उलण्याचा त्रास होण्याची शक्यता असते. या वेळी ओठांवर भेगा पडतात, शुष्कता वाढते आणि ओठांची जळजळ होते. गरम अथवा तिखट खाताना वेदना जाणवतात. ग्लिसरीन अथवा एखादं क्रीम लावून तात्पुरता आराम मिळतो. मात्र या त्रासावर काही घरगुती उपचार जास्त परिणामकारक ठरतात.  म्हणूनच शुष्कता कमी करून ओलावा टिकवण्यासाठी प्रय▪व्हायला हवेत.

१.साखरेचं स्क्रबिंग- ओठांवर साखर आणि मध एकत्र करून स्क्रबिंग करावं. हे मिश्रण ओठावर चोळल्यास मृत त्वचा निघून जाते आणि ओठातील ओलावा टिकतो.

२.मधाचं मॉइश्‍चरायझिंग- मध हे नैसर्गिक माइश्‍चरायझर आहे तसेच यामध्ये जंतुरोधक गुणधर्मही आहेत. दिवसातून दोन वेळा ओठांवर मध लावल्यास चिरण्या पडण्याचा त्रास कमी होतो आणि ओठांचं सौंदर्य राहतं.

३.गुलाबाच्या पाकळ्या – सुबक ओठांना गुलाबाच्या पाकळ्यांची उपमा दिली जाते. आता याच गुलाबाच्या पाकळ्या ओठांचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरता येतात. गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात भिजवून ठेवाव्यात. या पाकळ्यांची पेस्ट करून ओठांवर लावावी आणि १५ मिनिटांनंतर गरम पाण्यानं ओठ धुवावेत. यामुळे ओठांचं सौंदर्य वाढतं.