काव्य वाचन

mushroomsकवितेला मी मध्यम बनवून

एकच अर्चना माझी जाणून

कोणा समोर आणू दर्शना

प्रकट करतोय माझी भावना ……………

प्रेरणा कुठे दिसत नाही

स्वप्नासाठी जगतोय

मीच माझी प्रतिमा पाहून

जगी स्नेहाची ओळख देतोय ………………

रेशमाचे जुने जाते

अभिलाषा मनात आणते

आठवून ती नोवेदिता

प्रचीती रसिका येते …………………….

प्रीतीने मज फुल दयावे

तृप्तीने नयनात झुलावे

कोमल सरोज सुंदर असूनही

प्राजक्ताला जवळ घ्यावे ………………….

कल्पना कल्पिता मानसी

चादण्यात कृतिका हसली

संगीतासी इतक नात जुळ्क

कि सीमा सोडावी लागली ……………..

वीणाने वेड केल

मैफिलीत शोभा आली

मग मेघाने घोळ घातला

आणि रुचा निघून गेली ……………..

क्षध्दा आलो घेवून

ओढ लागली भक्तीची

मनात माझ्या पुझा ठेवून

वाट पहिली आरतीची …………..

अमृताचा शोध घेताना

संजीवनी जीवनी आली

समृद्धीच्या नादात

शांती विसरावी लागली ……………………

–  मयुरी पंढरीनाथ शेवाळे