का ? आजही महाराष्ट्रात…!

mhका ? आजही महाराष्ट्रात ,गावागावात असे चित्र पाहायला का भेटतेय ?

आपण सगळी माणसे मिळून आपले राज्य ,समाज ,संस्कृती बनलीये ना , झाडे ,पाने ,फुले ,फळ ,झरे ,नद्या ,समुद्र का नाही करत भेदभाव लोक लोकांमध्ये , ते का सगळ्यांशी न्यायाने वागतात ? प्रत्येक माणसाचे राहणीमान ,त्यांचे असणे हे सर्वस्वी त्या माणसात अंगभूत असणाऱ्या कौशल्यावर अवलंबून असते , अनेकदा आजूबाजूच्या परिस्थितीपुढे तो हतबल असतो ,ज्ञानाची ,रोजगारीची ,कमतरता त्याला सामाजिक,आर्थिक,राजकीयदृष्ट्या कमजोर बनवून ठेवते . आणि या सगळ्यांमुळेच ,जगात , नाही माफ करा इतकी विदीर्ण आणि किळसवाणी पद्धत महाराष्ट्रातच खितपत आहे , तोच महाराष्र्ण जो संतांनी , छत्रपतींनी , व्यासंगी राजकारण्यांनी घडविला , महाराष्ट्रातला प्रत्येक दुबळा शिकविला ज्याने त्यांच्या महाराष्ट्रात , इथे हरेकाला समान हक्क आणि न्याय मिळविण्यासाठी ,समाज सुसंस्कृत आणि सुशिक्षित बनविण्यासाठी आयुष्यभर झातालेल्यांच्या महाराष्ट्रात , गुलामिपासून सुटका करण्याकरिता प्राण आहुती देणार्यांच्या महाराष्ट्रात आज हे असे वंगाळ चित्र आहे . जरा निसर्गाप्रमाणे वागा , जर त्याने सुफळ संपूर्ण बहरायचे ठरवले तर प्रत्येक घरचे आंगण तो मोहरवून टाकतो , किंवा सगळंच वाहून नेतो , मग मला सांगा , आपण स्वतःस एक ,दुसर्यास एक , तर त्या तिसर्यास अत्यंत खालच्या दर्जाने न्याय का देतो , ते हि माणसेच आहेत , परिस्थितीपुढे वाकलीत इतकेच , पण म्हनून त्यांचे खच्चीकरण का केले जाते , त्यांना का लाथाडले जाते ,त्यांची जात हि अशोभिवंत का ? ते इतरांपेक्षा रसातळच्या श्रेणीचे का ? हेच शिकालोत का आपण संत एकनाथ , शिवाजी महाराज , जोतीबा फुले ,बाबसाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर झटून महाराष्ट्राला जातपात ,भेदभाव करायलाच शिकवले नाही. बर हे झाले आपल्या चुकांबद्दल , पण हा जो समाज आहे त्यालाही शिक्षणाची आस आहे असे दिसत नाही , मिळेल त्या कामाची कास धरून रात्री तुडुंब नशेत बुडून झोपी जायचे ,जमेल तेवढे ओंगाळ वागायचे , दडपशाही ,लोकांना त्रास देणे ,दहशत निर्माण करणे , हाणामार्या ,खून , दरोडे इत्यादी जेवढे म्हणून गुन्हे करता येतील ते करणे या सगळ्या बाबी दुर्लक्षित करून चालणार नाही .हे हि एक पुरोगामी महाराष्ट्रातले भीषण सत्यच आहे , आता यांच्यातून लाखोंच्या संख्येने लोक पुढारलेत , सुधारलेत पण म्हनून सत्य बदलत नाही . तर असा आहे , आजचा महाराष्ट्र पर्यायाने भारतच कि , कसला निर्माण झाला तर नाहीच , सुधारणावादी लोकांनी उलट जातीयवादाला खतपाणी घातलंय , आणि हे उपेक्षित ,दुर्लक्षित , हीन दर्जाकृत लोकांना देखील त्यांचे असे जगणे पसंत पडलंय , त्यामुळे म हा र ष्ट्र असा दुभांगलाय , तो जोडता आले तर पहा , बदला , बदला स्वतःला जरा ,तरच विकास घडू शकेल , नाहीतर उद्या आपण प्रत्येकजण एक fandri झालेलो असू . हि सुन्नता , बदलवून टाकेल का सर्वांना ????