का करावं स्विमिंग?
व्यायाम म्हटले की काहीजणांच्या अंगावर काटा येतो, लवकरच उठून पायपीट करणं अथवा जीममध्ये घाम गाळणं त्यांच्या प्रवृत्तीतच नसतं. अशांसाठी पोहण्याचा व्यायाम सर्वोत्तम आहे. पोहण्यानं शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम मिळतो आणि लवचिकता टिकून राहण्यास मदत होते. हा व्यायाम तर आहेच त्याबरोबर मनोरंजन होते.
वेगवेगळे स्ट्रोक्स शिकताना, पाण्यामध्ये खेळ खेळताना, पाण्यात चालताना एक वेगळीच मौज वाटते. पोहण्यानं शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. त्याचप्रमाणे उष्मांक जळण्यास मदत होते. पोहणं हा तणाव नष्ट करण्याचा एक उत्तम उपाय आहे. पोहताना शरीरात इंडोफ्रील नावाचं रसायन निर्माण होतं. हे रसायन डिप्रेशन घालवण्यासाठी परिणामकारक आहे. पोहताना संपूर्ण शरीर हलकं होतं आणि सुखावस्था प्राप्त होते. म्हणूनच पोहणं महत्त्वाचं ठरते.
Related Posts
-
स्मरणशक्ती वाढीसाठी
No Comments | Nov 14, 2014 -
एकत्र व्यायाम
No Comments | Oct 7, 2014 -
थंडीचा प्रतिकार करतांना….
1 Comment | Nov 26, 2013 -
विद्यार्थीदशेत मुलांच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी……
No Comments | Sep 26, 2013