किचन टीप्स
|१.ओल्या नारळाची वाटी शिल्लक राहिली तर टिकण्यासाठी थोडेसे मीठ चोळून ठेवावे.
२.नारळाचे दूध काढल्यावर चव फेकून न देता त्यामध्ये कांदा आणि डाळीचे पीठ घालून भाजी करावी. अत्यंत रुचकर भाजी होते.
३.कणिक चाळताना चाळणीत दोन-चार नाणी टाकली तर पीठ लवकर चाळले जाते.
४.भेंडी चिरताना हाताला थोडेसे तेल लावल्यास भेंडीचा बुळबुळीतपणा हाताला न लागता काम सोपे होते.
५.पुलावसाठी तांदूळ शिजवताना त्यामध्ये एखादा चमचा साखर घातल्यास शीतं मोकळी होतात.
६.जायफळ टिकवण्यासाठी रांगोळीमध्ये पुरून ठेवावी. त्यामुळे कीड लागत नाही.
७.मूग, मटकी, हरभरे वगैरे कडधान्याला भुंगा लागू नये यासाठी थोडीशी बोरिक पावडर लावून ठेवावी.