किल्ले राजगड

raigad1राजगड सर्वात उंच असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची १३९४ मीटर आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर व भोरच्या वायव्येला २४ की.मी. अंतरावर, नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्‍याच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे.राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. राजगडाला तीन माची व बालेकिल्ला आहे.

*मार्ग :-

पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात हा डोंगरी किल्ला असून, पुणे, भोर येथून गडावर जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत. कर्जत, पाली , पुणे, गुंजवणे बसस्थानकावरुन जाणाऱ्या रा.प. मंडळाच्या गाड्या किंवा खाजगी वाहन.

*गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :-

पद्मावती तलाव ,रामेश्वराचे मंदिर , राजवाडा , सदर , पाली दरवाज , गुंजवणे दरवाजा , पद्मावती ,माची , पद्मावती मंदिर , संजीवनी माची ,आळु दरवाजा , सुवेळा माची ,काळेश्वरी बुरुज आणि परिसर आणि बालेकिल्ला

अभेद्यतेचे दुसरे रुप असलेला बालेकिल्ला, चिलखती तटबंदीचे बांधकाम, नेढे अशी वैशिष्ट्ये बाळगणारा एकमेव गड म्हणजे ‘राजगड’. गडावरून निसर्गाच्या अकराळ-विकराळ पण तरीही सुंदर अशा स्वरूपाचे दर्शन होते. अतिशय देखणा पण चढण्यास अवघड असा हा किल्ला आहे.गडाचे रूप कायम चिरतरुण, लोभस असे. कुठल्याही ऋतूत पाहावे असे. त्याच्या पहिल्या दर्शनातच तो प्रेमात पाडतो. राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण 2 दिवस लागतात. गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा,सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *