कीचनची आखणी
प्रत्येक गृहिणीला स्वयंपाकघर आपल्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार सजवावेसे वाटत असते. अशी सजावट करताना अत्याधुनिक साधनांची माहिती मिळाली तर ती अधिक उपयुक्त ठरते.
बंगला बांधत असाल अथवा नवे घर खरेदी करत असाल तर घरातील सदस्यांची संख्या लक्षात घेऊन किचनचे आकारमान ठरवावे. जेवण बनवण्यासाठी लागणारी जागा, इलेक्ट्रिक उपकरणांची संख्या याचाही विचार करावा. याबरोबरच स्वयंपाकासाठी लागणारे सामान, भांडी, कपाटं यांचा विचार करून किचनची आखणी करावी.
अलीकडे मॉड्युलर किचन अधिक लोकप्रिय होत आहे. आकर्षक, सुसज्जित आणि स्वच्छ करणे सोपे असणार्या या किचनला बरीच मागणी आहे. या किचनमुळे अगदी छोट्या कोपर्यांचाही योग्य वापर करता येतो. र्मयादित जागेत जास्तीत जास्त सामान बसू शकते. हे किचन स्वयंपाकघराच्या आकारमानानुसार आणि ग्राहकाच्या गरजेनुसार बनवले जातात.
यामध्ये प्रत्येक वस्तूसाठी विशिष्ट जागा असते. घरातील जागेची कोणतीही तोडफोड न करता हे किचन बनवता येते हे याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अलीकडे किचनहूड लावायचीही फॅशन चलतीत असल्याचे दिसते. या सर्वांमुळे किचनला अत्याधुनिक टच देता येतो.
Related Posts
-
वास्तुशास्त्रानुसार सजवा रूम
No Comments | Jun 5, 2022 -
मेहंदी काढताना काही महत्त्वाच्या गोष्टी
No Comments | May 19, 2022 -
घर सजवा लॅम्पने .
No Comments | Jun 3, 2022 -
फुलझाडांनी सजवा बाल्कनी
No Comments | Jun 5, 2022