कुणीतरी असावं

कुणीतरी असावं,
गालातल्या गालात हसणारं..


भरलेच आसवांनी,
डोळे पुसणारं..


कुणीतरी असावं,
आपलं म्हणता येणारं..


केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं….