कुणी रात्र हि मंतरली

nightसुगरणीच खोपा नाही खाली

बाहेर पेटल्या मशाली

कसे लाड मी कवाड

नशिबान घेतली अंगावर दठाड

अंधारात ज्योत हि बियरली

कुणी रात्र हि मंतरली ……………………………..

 

वादळी तलवारीची गुसमट

अन रक्ताचे वाहते पाट

जिथेवर नजर भिरकली

तिथे माणसाने केला माणसाचा घात

उरलेली अशा चार भिंतीत जिरवली

कुणी रात्र हि मंतरली ………………………………….

 

रस्त्यावर लटकणारी अब्रूची लाखतरे

पेलतोय काळजात अंधातरी लटकलेला श्वास

सुनसान रस्त्यावर सैरावैरा धावणारी धामाधीता

वाढवतेय श्वासागणिक होणारा ऱ्हास

प्रकाश शोधता,वाट आता अंधारली

कुणी रात्र हि मंतरली …………………………..

 

मोडक्या खोप्यावर हक्क सांगून

मुखवटा पाहून प्राण घेणारे आलेत

एकतेचा पाठ पधवणारेच  आता

दंगलीचे ठेकेदार झालेत

मी हि प्राणाची भिक मागाया झोळी

हाती धरली

कुणी रात्र हि मंतरली …………………………………….

 

पिलांना धरिले पोटाशी

गिळलेला घास आला ओठापाशी

उभा ठाकला जातीचा गनीम

अरे भावद्यांनो एकच ना रे राम अन रहीम

पायी तुडवण्या का राष्ट्राची इभ्र्तच खाली अंथरली

कुणी रात्र हि  मंतरली …………………..