कुत्रा चावल्यास काय करावे?

     indexकुत्रा हा एक इमानदार प्राणी असला तरीही त्याच्या ‘चावणे’ ह्या गुणामुळे तो आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. आपल्या परिसरात अनेक कुत्रे वावरत असतात. सर्वच कुत्रे चावत नसले तरीही ते चावणारच नाहीत असेही नाही. त्यामुळे आपण नेहमी सावध असलेच पाहिजे. तरीही कुत्रा चावलाच तर काही महत्वाच्या टिप्स खाली देत आहोत ज्या नक्कीच उपयोगी पडतील….   
१) कुत्रा चालवल्यास जखम त्वरीत गरम पाण्याने स्वच्छ धुवावी.जखमेवर गरम पाण्याची धार सोडावी.

२) जखमेवर स्पिरीट, टीचर आयोडिनसारखे जंतुनाशकलावावे. जखमेवर पट्टी बांधू नये. 

३) कुत्रा चावल्यानंतर उपचारासाठी त्वरीत डॉक्टरांचा सल्लाघ्यावा.

४) दंश करणार्‍या कुत्र्यावर पाळत ठेवावी. दहा दिवसाच्या आत जरतो मेला तर रेबीज होणार हे निश्‍चित असते.
५) कुत्र्याशी संपर्क येणार असल्यास प्रीएक्सपोजर रेबीजलसीकरण करून घ्यावे.

3 Comments