कुरकुरीत कारली
|१) कारली तीन (पोपटी , पांढरट रंगाची घ्यावीत )
२) तेल , कांदा एक
३) तिखट , हळद
४) हिंग , आमचूर
५) कोथिंबीर , गूळ दोन चमचे
६) जिरेपूड अर्धा चमचा
७) चवीनुसार मीठ .
मसाला :-
१) सुकं खोबरं एक वाटी
२) तीळ एक चमचा
३) जिरं एक चमचा भाजलेलं
४) हरभरा डाळ पाच चमचे
५) उडीद डाळ एक चिमुट
६) लाल मिरची एक हे सर्व जिन्नस खमंग , कोरडे भाजून घ्यावेत . नंतर सर्व साहित्य एकत्र वाटून घ्यावं .
कृती :-
१) कारल्याची फक्त देठं काढून बोटभर लांबीचे एकसारखे काप करावेत .
२) उकळत्या पाण्यात एक चिमुट हळद व एक चिमुट मीठ घालून कारल्याचे तुकडे टाकावेत .
३) झाकण ठेवून पाच मिनिटं सळसळ उकळून घ्यावेत . नंतर चाळणीत किंवा रोवळीत ओतून पाणी काढून टाकावं .
४) त्यावर लगेच गार पाणी ओतावं . पाणी पूर्णपणे निथळल्यावर तुकडे मुठीत दाबून पाणी काढून टाकावं .
५) हे करताना तुकडे मोडू देऊ नयेत . ते सर्व तुकडे कागदावर दहा मिनिटं पसरावेत .
६) एक ते दीड डाव तेल गरम करून कारल्याचे तुकडे चुरचुरीत-कुरकुरीत तळून काढावेत . बारीक चिरलेला कांदा त्याच तेलात परतावा .
७) कारली-कांदा काढून घेऊन त्याच कढाईत किंवा दुसऱ्या पैनमध्ये गूळ (आवडीप्रमाणे) घ्यावा व दीड वाटी पाणी घालून गरम करावं . पाक करू नये .
८) गूळ विरघळला की त्यात तिखट , मीठ , हळद , हिंग , आमचूर , जिरेपूड , कोथिंबीर आणि वरील मसाला यांचं एकत्रित मिश्रण करून टाकावं .
९) कारली व कांदा घालवा . सर्व मसाला , गूळ सॉस कारल्याच्या फोडींना लागला पाहिजे .