कुर्डूची भाजी

kurdu chi bhaji

साहित्य :-

१)      कुर्डूचा कोवळा पाला (टीक्षा) चार वाटया

२)     कांदे दोन

३)     हिरव्या मिरच्या एक-दोन

४)     मीठ , तिखट

५)    गुळ , तेल

६)      फोडणीचं साहित्य

७)    चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      पाला बारीक चिरावा .  कोवळे देठ असल्यास चालतील .

२)     तेलाच्या फोडणीत बारीक चिरलेला कांदा एक वाटी , मिरचीचे तुकडे टाकून तांबूस परतावे .

३)     त्यावर पाला टाकून परतावं .  चवीला तिखट , मीठ , गुळ , खोबरं घालून मंद आचेवर वाफा येऊ द्याव्यात .