केक

cake

साहित्य :-

१)      एक वाटी साखर बारीक केलेली

२)     १२५ ग्रॅम मैदा

३)     ३ अंडी , पाव कप दुध

४)     पाऊण चमचा बेकिंग पावडर

५)    दहा चमचे लोणी किंवा डालडा

६)      पाव चमचा Vhanila इसेन्स .

कृती :-

१)      बारीक केलेली साखर व डालडा एकत्र करून भरपूर फेटून घ्यावे .  मग ते मिश्रण हलके झाले की त्यात मैदा टाकावा व पुन्हा फेटावे .

२)     थोडया वेळाने बेकिंग पावडर , Vhanila इसेन्स , दुध टाकावे व शेवटी अंडी टाकून   भरपूर फेटून घ्यावे .

३)     नंतर केकपात्राला किंवा ज्या भांडयात केक बेक करावयाचा असेल त्या भांडयाला   लोण्याचा हात लावून त्यात हे मिश्रण ओतावे व ओव्हनमध्ये किंवा तव्यामध्ये वाळू तापवून त्यावर केक बेक करावा .