केरळ

केरळला जाण्याचा उत्तम कालावधी हा जूनपासून सुरु होतो. उन्हाळ्यात या ठिकाणी जाण्यास काहीच हरकत नाही. पण तुम्हाला उन्हाळ्यातकाही भागांमध्ये भयकंर उकाडा जाणवेल.


केरळला जाण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तुम्ही ट्रेनने जाणार असाल तर थेट तिरुअंतपुरमला उतरुन मजल दरमजल करत फिरु शकता. तिरुअनंतपुरम केरळचं एक टोक आहे. जिथून तुम्हाला खाली येत म्हणजे एर्नाकुलम असे करता येते.
काही टूर्स या तुम्हाला कोचीवरुनही नेतात. कोचीवरुन तुम्ही जाणार असाल आणि तुम्हाला दिवस प्रवासात वाया घालवायचे नसतील तर तुम्ही फ्लाईट करुनही जाऊ शकता.


केरळ हे राज्य अजिबात लहान नाही. तुम्हाला रोड ट्रॅव्हल भरपूर कराव लागते. त्यामुळे बसमध्ये बसण्याची तयारी ठेवा.
केरळच्या काही भागांमध्ये तुम्हाला मोठा उकडा तांदूळ मिळतो.काही ठिकाणी तुम्हाला जेवण आवडेलच असे नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्यासोबत काही चांगले कॅरी करा.


केरळच्या काही भागात तुम्हाला खूप गरम होईल म्हणजे कन्याकुमारी आणि तिरुअमंतपुरमचा काही भाग. तर पेरियार आणि मुन्नारमध्ये तुम्हाला थंड वाटेल त्यामुळे तुम्ही थंड हवेचे कपडे नक्की कॅरी करा.

खरेदीचा विचार करत असाल तर तुम्हाला कन्याकुमारीला मोत्याचे दागिने, पेरियार आणि एर्नाकुलममध्ये तुम्हाला साड्या, ड्रेस मटेरिअल्स,स्कार्फ घेता येईल.

तुम्हाला पडलेत का प्रश्न :

केरळला जाण्याचा उत्तम कालावधी कोणता?
केरळला समुद्र किनारा जवळ असल्यामुळे या ठिकाणी वातावरण थोडे उष्ण असते. म्हणजे मुन्नार वगळता तुम्हाला अन्य कोणत्याही ठिकाणी गारवा असा जाणवणार नाही. त्यामुळे तुम्ही साधारण दिवाळीपासून ते फेब्रुवारी या कालावधीत जाऊ शकता. पावसाळ्यात या ठिकाणी प्रसन्न वातावरण असले तरी येथे गेल्या काही वर्षांपासून खूप पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. त्यामुळे वातावरणाचा अंदाज घेऊन तुम्ही बुकींग करा.

केरळ कशासाठी प्रसिद्ध आहे?
दक्षिणेकडील राज्य हे त्यांच्या संस्कृतीसाठी फारच प्रसिद्ध आहे. केरळमध्ये तुम्हाला अनेक प्रसिद्ध देवस्थान पाहता येतील. या प्रत्येक देवस्थानांमागे तेथील लोकांची श्रद्धा आणि आख्यायिका फारच प्रसिद्ध आहे. येथील देवस्थांनामध्ये जाण्यासाठी असलेली शिस्त फारच वाखाणण्यासारखी आहे. या शिवाय केरळ चहा, कॉफी, तेथील जेवण, समुद्र किनारे आणि मसाले यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.

केरळमध्ये गेल्यानंतर काय करता येईल?
केरळमध्ये करण्यासारखे बरेच आहे. तुम्हाला वॉटर स्पोर्टसचा पर्याय इथे उपलब्ध आहे. पेरियारमध्ये तुम्हाला मसाले मिळतील. केरळमध्ये गेल्यानंतर तुम्ही हमखास करायला हवा तो म्हणजे मसाज. कारण या ठिकाणी शास्त्रशुद्धपद्धतीने मसाज केला जातो. त्यामुळे तुम्ही या गोष्टी अगदी हमखास करायला हवा.

केरळमधील सगळ्यात सुंदर ठिकाणं कोणते?
केरळ हे राज्य निसर्ग सौदंर्याने नटलेले आहे. त्यामुळे येथील प्रत्येक ठिकाणाचे असे वैशिष्टय आहे. येथील मुन्नार हे थंड हवेचे ठिकाण आहे. इथे तुम्हाला कमालीची प्रसन्नता मिळेल. तर पेरियार हे ठिकाण डोंगरावर असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला चहाचे मळे, मसाला शेती पहायला मिळतील. या शिवाय कोची, कन्याकुमारी ही ठिकाणही फार सुंदर आहेत.