केले के कोफ्ते
|१) कच्ची केळी मोठी चार-पाच
२) पालकाच्या दोन-तीन मोठया जुडया
३) कांदा किसून एक वाटी
४) लाल अख्खी मिरची तीन-चार
५) मैदा अर्धी वाटी , गरम मसाला
६) काळी मिरची पावडर अर्धा चमचा
७) क्रीम शंभर ग्रॅम , कोथिंबीर
८) आलं-लसूण पेस्ट
९) आमचूर अर्धा चमचा
१०) कसूरी मेथी अर्धा चमचा
११) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) कच्ची केळी सोलून , तुकडे करून कुकरमध्ये शिजवून घ्यावीत . किसून घ्यावीत .
२) त्यात मैदा , मीठ मिरपूड , गरम मसाला , जिरं टाकून त्याचे गोळे बनवून तळून घ्यावेत .
३) बाजूला ठेवावेत . पालकही कमी पाण्यात कुकरमध्ये फक्त एक शिट्टी देऊन शिजवावा .
४) पालक गाळून ते पाणी बाजूला ठेवावं . पालक पूर्ण निथळून घेऊन लाल मिरचीबरोबर वाटावा .
५) कढाईत गरम तेलात कांदा सोनेरी होईपर्यंत परतावा . आलं-लसूण पेस्ट टाकून परत परतावं .
६) किंचित लाल तिखट टाकावं . हळद अजिबात टाकून नये . रंग अजून सोनेरी झाला की आमचूर टाकावं , वाटलेला पालक टाकावा .
७) जरा परतून गाळलेलं पाणी घालावं . तळलेले केळाचे कोफ्ते त्यात टाकून कसूरी मेथी टाकावी .
८) केले के कोफ्ते तयार ! गरम पराठे , फुलके यांच्याबरोबर गरम गरम खावेत !