केळफुलाची भाजी

banana_blossom_curry_01

साहित्य :-

१)      केळफूल

२)     भिजलेले हरभरे अर्धी वाटी

३)     आंबट ताक अर्धी वाटी

४)     मीठ , गुळ , ओलं खोबरं

५)    तेल , फोडणीचं साहित्य .

कृती :-

१)      केळफुलाची वरची आवरणं काढून टाकावीत .  आतल्या गाभ्यातली फुलं सुटी  करावीत .

२)     प्रत्येक फुलातला पांढरा दांडा (पुंकेसर) काढून टाकून ही फुलं बारीक चिरावीत .  अगदी आतला घट्ट गाभा काकडीप्रमाणे चोचवून घ्यावा .

३)     सुरुवातीला केळफूल फार कडवट नाही ना पहावं .  पातेलीत पाणी घेऊन त्यात अर्धी वाटी आंबट ताक घालावं .

४)     त्यात ही भाजी टाकावी .  तास-दोन तास भिजू दयावी .  म्हणजे राप निघून जाईल .  ताक नसल्यास मिठाच्या पाण्यात टाकावी .

५)    नंतर फोडणीत सांगडी मिरची टाकावी .  त्यावर भिजवलेली डाळ घालून वाफवून घ्यावी .  ताकातलं केळफूल घट्ट पिळून काढावं आणि डाळीवर फोडणीला टाकावं .

६)      बेताचं पाणी घालून शिजवावं .  मीठ , गुळ , ओलं खोबरं घालून मंद विस्तवावर दोन-तीन वाफा आणाव्यात .

७)    या भाजीत आवडत असल्यास कांदा , सांगडी मिरचीही घालतात .