केळीच्या कालाची भाजी

Kelful-bhaji-Feat1-610x300

(केळीच्या खुंटाची वरची सोपं काढून टाकल्यावर आत जो कोवळा गाभा राहतो , त्याला ‘काल’ असं म्हणतात .  कालाची भाजी आयत्या वेळी करायला घेऊ नये .  तसंच काल चिरताना आत दोर आहेत का पहावं .  असल्यास ते काढून टाकावेत .)

साहित्य :-

१)      केळीचा काल चार वाटया

२)     भिजवलेली मुगाची डाळ अर्धी वाटी

३)     तिखट अर्धा चमचा

४)     गोडा मसाला

५)    ओलं खोबरं

६)      मीठ , गुळ , तेल

७)    फोडणीचं साहित्य .

कृती :-

१)      केळीच्या आतला काल , गोल चकत्या काढून पुन्हा बारीक चिरावा .

२)     तो पाण्यात टाकावा .  दोन-तीन वेळा पाण्यातून चांगला चोळून , धुवून घ्यावा .

३)     म्हणजे राप निघून जाईल .  घट्ट पिळून त्याला हळद चोळून काही तास दाबून ठेवून द्यावं .

४)     त्यानंतर फोडणी करून त्यात भिजवलेली मुगाची डाळ व चिरलेला काल टाकून वाफ आणावी .

५)    गरज वाटल्यास पाण्याचा हबका मारून डाळ व भाजी नीट शिजू दयावी .

६)      त्यानंतर तिखट , गोडा मसाला , चवीनुसार गुळ , मीठ घालून एक-दोन वाफा आणाव्यात .  वरून ओलं खोबरं घालावं .