कॉर्न ऑन टोस्ट

साहित्य :-corn on toast

१)      टोस्टसाठी दहा ब्रेड स्लाईस

२)     थोडं बटर . 

कॉर्न स्ट्यूसाठी :-

१)      तीन गावरान मक्याची कणसं

२)     दोन-तीन हिरव्या मिरच्या

३)     एक मोठा कांदा

४)     दोन कप दुध

५)    एक मोठा चमचा मिरपूड

६)      अर्धा चमचा लोणी

७)    चिरलेली कोथिंबीर

८)     चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      कणसं सोलून किसणीवर किसून घ्यावीत .  मिरच्या एकदम बारीक चिराव्या . 

२)     कणसाच्या किसात दुध मिसळून कुकरमध्ये दोन शिट्टया कराव्यात . 

३)     नॉनस्टीकच्या भांडयात लोणी तापवावं आणि त्यात चिरलेल्या मिरच्या घालाव्या . 

४)     बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतावा .  मग शिजलेलं    दुध आणि कॉर्न घालून मीठ आणि मिरपूड घालावी . 

५)    खाली उतरवल्यावर कोथिंबीर मिसळावी .  वाढायच्या वेळी कॉर्न स्ट्यू       परत गरम करावं . 

६)      ब्रेडचे स्लाईस टोस्टरमधून भाजावेत .  त्रिकोणी दोन तुकडे कापावेत .      त्याला बटर लावून त्यावर गरम कॉर्न स्ट्यू पसरावं .  टोमाटो सॉसबरोबर    खायला दयावं .