बांबूच्या (कळकीच्या) कोंबांची भाजी

साहित्य :-

१)      बांबूचे कोवळे कोंब पाव वाटी

२)     भिजवलेली हरभरा डाळ पाव वाटी

३)     गोडा मसाला एक चमचा

४)     तिखट अर्धा चमचा

५)    मीठ , गुळ

६)      ओलं खोबरं

७)    दुध अर्धी वाटी .

कृती :-

१)      बांबूचे कोंब सोलून घ्यावेत .  नंतर त्यांचा गाभा स्टीलच्या किसणीवर किसावा .

२)     थोडा वेळ तो पाण्यात टाकावा .  नंतर कीस चांगला वाफवून घ्यावा .

३)     भिजवलेली डाळ फोडणीत परतून घ्यावी . 

४)     त्यावर वाफवलेला कीस , तिखट , गोडा मसाला , मीठ , गुळ घालून भाजी शिजवावी . 

५)    शिजताना दुध घालावं .  पाणी घालू नये .  अतिशय चविष्ट अशी ही भाजी  आहे .