कोची (Kochi)
|कोची (Kochi)
कोची बंदर – केरळ पर्यटन स्थळ

केरळमधील कोची हे शहर कोचीन नावाने देखील ओळखले जाते. कोचीमध्ये तुम्हाला भरपूर शॉपिंग करता येईल. कोचीन केरळमधील फारच प्रसिद्ध बंदर आहे. येथे पोर्तुगीजांचे राज्य होते. त्यामुळे तिथे आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात चालते. तुम्हाला या ठिकाणी उत्तम ड्रेस मटेरिअल्स, सोनं आणि इतर दागिन्यांचे प्रकार मिळतील. त्यामुळे केरळला आल्यानंतर कोची अगदी मस्ट आहे. तुम्हाला या ठिकाणी पोर्तुगीजांच्या अस्तित्वाच्या अनेक गोष्टी पाहाचयला मिळतील.
पाहण्यासारखी ठिकाणं
कोची किल्ला, मत्तान चेरी पॅलेस, चेराई बीच आणि बरेच काही
कोचीमध्ये करण्यासारख्या गोष्टी
कोची फिरण्यासोबतच शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी मनसोक्त शॉपिंग करा तुम्हाला या ठिकाणी उत्तम कपडे मिळतील तेही अगदी वाजवी दरात तुम्हाला मिळेल.